Tuesday, November 20, 2012

बाबासाहेबांनी इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्विकारला नाही ही त्यांची चूक होती का ??

काही दिवसांपुर्वी माझा बौद्ध मित्र पियुश खोब्रागडे याच्या ब्लॉग वरील "काय आपण बुद्धाचा महार करुन ठेवलाय ?" हा एक अतिषय सुंदर व अंतर्मुख करणारा लेख वाचनात आला, अपेक्षीत आणि दुर्लक्षीत अशा एका मुद्द्यामध्ये पियुष ने हात घातला होता याबद्दल मी त्याचे कौतूक करीन. जे "खरे बौद्ध" आहेत किंवा ज्यांना, भगवान बुद्धांच्या शिकवणूकीने चालणारे , आर्य अष्टांगमार्ग पाळणारे,  भगवान बुद्धांनी सांगीतल्याप्रमाणे अध्यात्मिक व पारमार्थीक साधना करणारे पियुश सारखे ज्यांना "बौद्ध" म्हणावे असे बौद्ध खुप कमी भेटत आहेत. आणि बौद्ध धर्माचा आधार घेवून स्वत:चे नाकर्तुत्व झाकण्यासाठी हिंदु धर्मावर टिका करणारे बौद्ध हे आपल्याला आज जागोजागी आढळतात, आणि याचमुळे समाजात बौद्ध धर्माचा आणि भगवान बुद्धांची प्रतिमा अतिशय मलीन होत आहे या गोष्टीचा  सर्व "बौद्ध" बांधवांनी विचार केला पाहीजे, बाबासाहेब आंबेडकरांनी कटाक्षाने नविन एखादा धर्म स्थापन न करता व ईस्लाम किंवा ख्रिस्ती सारखे परके धर्म न स्विकारता बौद्ध धर्म स्विकारला, हे काही लोक विसरत चालले आहेत व त्याच बाबासाहेबांच्या नावाने आणी त्याच बौद्ध धर्माचा आधार घेवून हे अविचारी लोक इस्लाम व ख्रिस्ती धर्माला पुरक असे काम करत आहेत यामध्ये बाबासाहेबांचा आणि भगवान बुद्ध व त्यांच्या धम्माचा अपमानच नाही का ?  तथाकथीत शिवधर्मी लोकांना मी नेहमी विचारत असतो की अशी काय कमी बौद्ध धर्मामध्ये होती की त्यांनी बौद्ध धर्मालाही लाथाडून स्वत:चा असा नविन धर्म काढला  ?? त्यामुळे अप्रत्यक्षपणे बाबासाहेबांनी  नविन धर्म स्थापण न करता बौद्ध धर्म स्विकारला ही बाबासाहेबांची चूक होती असा चुकीचा समज समाजात पसरत आहे याचा विचार होणार आहे की नाही माहीत नाही. आणि याचमुळे कदाचीत मधुकर रामटेकेंसारखे बौद्ध विचारवंत या तथाकथीत नविन धर्म वाल्यांच्या नवधर्माला विरोध करत म्हणतात, "जय भीम ला रिप्लेस करतोय जय मुलनिवासी". रामटेके सरांनी या तथाकथीत दिखाऊ नविन धर्म वाद्यांची दिखाऊ बौद्ध भक्ती पुरेपूर उघडी पाडली आहे. बौद्ध धर्म म्हणजे हिंदु धर्मावर टिका करन्याचे सर्टिफिकिट , मग त्या बुद्धांची शिकवण काय आहे हे भले माहीत नसो , त्या आर्य अष्टांगमार्गचा आम्हाला गंध ही नको असे काही समिकरण झाले आहे आणि असे होत होत अप्रत्यक्षपणे बौद्ध धर्म बदनाम होत आहे याचा विचार बौद्ध विचारवंतांनी व भगवान बुद्धांच्या तत्वांशी प्रामाणीक असणार्‍या माझ्या बौद्ध बांधवांनी अवश्य करावा. मगे महाविर सांगली करांच्या ब्लॉग मध्ये वाचले होते की बाबासाहेबांनी धर्मांतरासाठी बौद्ध धर्म हा त्यांच्यासाठी पहिला पर्याय नव्हता, तर तो शेवटचा पर्याय होता म्हणुन बौद्ध धर्म स्विकारला. बौद्ध धर्म स्वीकारण्यागोदर  त्यांनी शीख आणि जैन या दोन धर्मांचा विचार केला होता पण या दोन्ही धर्मांनी बाबासाहेबांच्या या धर्मांतराला विरोध त्यामुळे नाईलाजास्तव शेवटी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा पर्याय निवडला, आणि त्याचीच फळे आज भगवान बुद्ध व बौद्ध बंधव आज भोगताना दिसत आहेत. आजपर्यंत मला जेजे नवबौद्ध भेटले त्यांपैकी एकालाही भगवान बौद्धांची आर्य अष्टांगमार्ग माहीतही नाहीत काय आहेत ती यावेळी यांच्या तोंडून चकार शब्द ही फुटत नाही परंतु हिंदु धर्म आणि वर्णव्यवस्था / जातव्यवस्था असे विषय काढायचा अवकाश, जिवाच्या आकांताने चर्चेत सहभागी घेतात (नुसते बोलायला काय जाते म्हणा ..). ज्या वर्णवादाचा आणि जातीवादाचा शिक्का पुसला जावा म्हणुन बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्विकारला त्याच बौद्ध धर्माच्या आडोशाला उभारुन आता आपल्या जे काही असतील त्या वर्णाचा आणि जातीचा अभिमान बाळगताना हे लोक दिसत आहेत (शुद्रा: द रायजिंग म्हणे ..). अरे  आधी स्वत: ठरवा की आपल्याला नेमके काय करायचे आहे, जाती व्यवस्था नष्ट करायच्या आहेत कि त्या तशाच ठेवुन त्यांचा अभिमान बाळगायचा आहे. हे ही साधे विषय स्पष्ट नसणारे मुर्ख मनु:स्मृती / वर्णव्यवस्था वगैरे वगैरे गोष्टी करत आहे हे पाहुन खुप हसू येते.

    बाबासाहेबांनी इस्लाम व ख्रिस्ती धर्म कटाक्षाने टाळले त्याच धर्मांचा अप्रत्यक्षपणे स्विकार शिवधर्माच्या माध्यमातुन बाबासाहेबांचेच नाव घेवून केला जात आहे. सन २००१ मध्ये डबरण येथे WCC (Word Church Council)  चे विश्वसंमेलन झाले, त्यामध्ये  भारतीय दलीत नेत्यांनी सुद्धा हजेरील लावली. पाकीस्तान मधील झाईद हमीद सारख्या भारतद्वेश्टा म्हणतो "भारतामध्ये काही हिंदु (गझुआ-ए-हिंद) अलाह चे पवित्र कार्य एक हिंदु रहुनच करत आहे" याचा अर्थ काय घ्यायचा ?? याच विद्रोही लोकांच्या घरी परदेशी चलन सापडले, या लोकांनी आता शिवरायांच्या नावाने मुस्लिम ब्रिगेडही चालू केली आहे आहे आणि या मुस्लिम ब्रिगेड च्या कार्यक्रमांमध्ये हिरवे झेंडे नाचवले जातात ,..... या सगळ्या गोष्टिंचा काय अर्थ होतो ? तथाकथीत काही विद्रोही लोक भगवान बुद्धांचे नाव घेवु भोळ्या बौद्ध बांधवांना चुकिच्या आणि विरुद्ध दिशेने घेवुन जात आहेत हे बौद्ध बांधवांनी समजुन घेतले पाहीजे, भगवान बुद्ध हे हिंदु धर्मीयांना कधीही प्रियच आहेत, बुद्धांनी तर कधीच जातीवाद मानला नाही त्यांचे महाम्मोगल्लान सारखे अनेक शिष्य हे त्याकाळी वरिष्ठ अशा समजल्या जाणार्‍या समाजातील होते, भगवान बुद्धांना विष्णुचे नववे अवतार हिंदु मानतात (बुद्ध हे विष्णूचे अवतार होते की नाही याची चर्चा मला इथे करायची नाहीये .) सांगण्याच उद्देश येवढाच की भगवान बुद्ध हे हिंदुंना वंदनियच आहे परंतु काही लोकांनी भगवान बुद्धांची प्रतीमा समाजामध्ये मलिन करण्याचा प्रयत्न चालवला आहे (बर्‍याचशा प्रमाणात  केली ही आहे ) . तो आपल्याला हानुन पाडायचा आहे.

Saturday, October 27, 2012

विद्रोहाचा अंत इथे .

आज या देशा मध्ये, विषेशत: महाराष्ट्र आणि पंजाब जेथे देशातील लढवय्या समाज जो मराठा आणि शिख या नावानी वास करतो अशा ठिकाणी वेगवेगळ्या नावानी फुटीरतेची बिजे रोवण्याचा प्रयत्न चालू आहे. येथला ब्राम्हणद्वेशाचा मुद्दा ही त्याच बिजांचा परिणाम आहे. आज महाराष्ट्रात विद्रोही म्हणत असलेल्याप्रमाणे नेमका किती प्रमाणात ब्राम्हण्यवाद चालु आहे आणि त्यामध्ये सध्याच्या ब्राम्हणांचा किती वाटा आहे याची जाणि जाणि तथाकथीत विद्रोह्यांना असल्यामुळेच कदाचीत हे विद्रोही क्षणो -क्षणी आपल्या अनुयायांची माथि भडकवायला नेहमी विकृत इतिहासाकडे जातात. इतिहासात यांनी असे केले , इतिहासात त्यांनी तसे केले म्हणुन आज आम्हि सराकट ब्राम्हण समाजाची कत्तल करण्याची भाषा करत आहोत, हे किति बरोबर आहे याचा विचार त्यांचे अनुयायी म्हणवणारे तथाकथीत सत्यशोधक, विद्रोही ( न जाणो आनखी काही विषेषणे आहे त्यांचा उल्लेख न करणेच योग्य) हे लोक का करत नाहीत मला कळत नाही. यांच्या या ब्राम्हणद्वेशाला सुशिक्षीत समाज भिक घालत नाही. तसेच सध्या यांच्या यांच्यातच मतभेद चालू आहेत या केवळ "हिंदु" विरोधासाठी एकवटलेल्या विभिन्न विचारसणीच्या टोळ्यांमध्ये आपल्या विचारसरणीला धरुन वादविवाद (याच्याही पुढे जाऊन थेट आरोप आणि शिव्याशापही) होतात हे वेगळे सांगायची गरज नाही. विद्रोही चळवळीतील अनेक मान्यवरांना काही विद्रोही लोकांचा अति-ब्राम्हणद्वेश अजिबात मान्य नाही , तर या अतिउत्साही ब्राम्हणद्वेश करणार्‍यांना काही प्रौढ मान्यवरांचे प्रौढ विचार पचनि पडत नाहीत.  ज्या बाबासाहेबांनी हिंदु देवदेवता व संतांना रामराम ठोकुन बौद्ध स्विकारला होता , त्याच बाबासाहेबांचे नाव घेवुन हेच विद्रोही त्याच बाबासाहेबांना त्याच हिंदु साधु संतांच्या पंक्तीत बसवुन त्यांच्यासोबत बाबासाहेबांचाही जयघोष करताना दिसतात ही गोष्ट बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायांच्या पचनी पडत नाही , तर विद्रोह्यांना या लोकांचा बाबासाहेबांच्या नि:सिम अनुयायीवाद हा अति-आंबेडकरवादी वाटतो. हे विद्रोही बौद्ध धम्म आणि भगवान बुद्धांना आपले मानतात तर दुसरीकडे बौद्ध धर्म न स्विकारता स्वत:चाच असा वेगळा धर्म काढून बुद्धांच्या अनुयायांना आपल्या या नव्या धर्मात येणयासाठी आवाहन करतात आणि ही गोष्ट बौद्ध अभ्यासकांच्या पचनी पडत नाही तेव्हा ते सरळ सरळ विद्रोह्यांना व त्यांच्या अनुयायांना बौद्ध धर्मातच यायचा सल्ला देतात. पण हा सल्ला विद्रोह्यांना पेलवत नाही. इतकेच काय तर हिंदु संकृतीवर बेंबीच्या देठापासुन ताशेरे ओढणारे अनेक विद्रोही नेते हे स्वत: घरी सत्यनारायणाची पुजा घालतात, घारामध्ये हिंदु पद्धतीचे सण-उत्सव साजते करतात , आणि याच्याही पलिकडे ब्राम्हणवाद ब्राम्हणवाद म्हणुन राण उठवणार्‍यांना बायको कशी ब्राम्हण चालते हे मला आजतागायत पडलेले कोडे आहे. एकिकडे हिंदु धर्माने स्त्रियांना उंबरठ्यापलीकडे जाऊ दिले नाही म्हणुन हिंदु धर्माला शिव्या शाप द्यायच्या त्याच स्त्रियांची आजची परिस्थिति काय आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे आजपर्यंत या लोकांनी काय प्रयत्न केले याची माहीती मला आजपर्यंत एकाही विद्रोह्यांनी दिलि नाहि, कदाचीत स्त्रिला हजार सालापुर्वी ज्यांनी कोंडून ठेवले त्यांच्या नावाने बोंबा मारल्या की आजच्या स्त्रियांच्या समस्या सुटतील असा यांचा समज असावा बहुतेक. याच्याही पलिकडे जाऊन हे हिंदु धर्माला शिव्या देत देत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माचे गोडवेही गाऊ लागले आहेत, आणि ते ही चक्क बाबासाहेबांचे नाव घेवुन . ज्या बाबासाहेबांनी आपल्या थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकातुन ओरडून ओरडून सांगीतले की "मुसलमानांचे बंधुत्व हे सर्व मनुष्यांकरिता नसुन ते फक्त मुस्लिमांपुरते मर्यादीत आहे. जे मुस्लिम संघाच्या बाहेर आहेत त्यांच्याकरीता घृणा व शत्रुता याच्याविना काही नाही" किती विरोधाभास हा ? आंबेडकरांची इतर पुस्तके स्वत:च्या रसभरीत अनुवादासहीत प्रकाशित करुन मोफत वाटणारे त्यांच आंबेडकरांनी लिहिलेले थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तका बद्दल ब्र ही काढत नाही याचे कारण काय बरे असावे ? शेवटी केवळ हिंदु द्वेश या एका समिकरणातुन एकत्र आलेले हे अभद्र एकत्रिकरण आता स्वत:मधेच असलेल्या अंतर्गत वादातुन नष्ट होईल यात शंका वाटत नाही. 

Friday, October 26, 2012

ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे


सध्या बाजारामध्ये अनेक संघटना, पक्ष, चळवळी केवळ एका आधारावर उभ्या आहेत तो म्हणजे ब्राम्हणद्वेष !  ब्राम्हणद्वेष पसरवायचा आणि  आपले वैयक्तीक, पाक्षीक किंवा सांघटनीक स्वार्थ साधुन घ्यायचा असा एक ट्रेड चालू आहे. देशासमोर आ वासुन उभे असलेल्या समस्यांना, प्रश्नांना , अडचणींना बदल देवुन कोणी एके काळी ब्राम्हण समाजाने आमुक आमुक या समाजावर काहीतरी तमुक तमुक अन्याय केले हे जिवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगायचे (ओरडायचे कारण म्हणजे तो मुद्दा देशाच्या इतर प्रश्नांपेक्षा महत्वाचा वाटायला हवा यासाठी) आणि समोर बसलेल्या ठरावीक एका सामाजीक वर्गाला ज्याच्याकडे इतरांच्या तुलनेत बौद्धीक विचारक्षमता कमी आहे त्यांच्यापुढे वाघ म्हणुन मांजराला पुढे करायचे , जेणेकरुन जो खरा वाघ आहे त्याच्याकडे लोकांचे दुर्लक्ष होईल. कसे का ? कारण म्हणजे या खर्‍या वाघाचे आणि जिवाच्या आकांताने ओरडणार्‍यांचे साटेलोटे आहे हे सांगण्यासाठी काही मोठ्या तत्वज्ञाची गरज नाही.
थोडक्यात ब्राम्हणद्वेशावर या लोकांचे पोटपाणी चालू आहे. या ब्राम्हणद्वेशाची पाळेमुळे खनुन काढल्याशिवाय या तथाकथित ब्राम्हणद्वेशी लोकांचा स्वार्थ आणि यांचे खरे जावाई आणि घरजावाई कोण हे लक्षात येणार नाही .
भारतावरील ७११ साली पहिले इस्लामी आक्रमण झाले, त्यानंतर तब्बल ३०० वर्ष हिंदु योध्यांनी ही आक्रमणे थोपवुन धरली , त्यानंतर मात्र हिंदु प्रतिकार शिथिल होवून इस्लामी आक्रमणे तिव्र होवू लागले त्यापासुन पुढे साधारण ६०० वर्षे हिंदुस्थानामध्ये इस्लामी टोळधाडी, आक्रमणे, लुटालूट, हिंसाचार यांची पराकाष्ठा झाली, यामध्ये हिंदुस्थानातील हिंदुंचा स्वधर्माप्रती असलेला स्वाभिमान इस्लामी आक्रमाकांनी रसातळाला नेला, त्याचबरोबर अनेक वैदीक ग्रंथ व पुस्तके , अनेक ऐतिहासीक साधने नष्ट केली. त्यानंतर शिवरायांचा जन्म झाला व हिंदुस्थान इस्लाममय होण्यापासुन  वाचला. त्यानंतर इंग्रज आले , त्यावेळी वैदीक ग्रंथ , पुस्तके , साहित्य आणि ऐतिहासीक दस्तैवज विखुरलेले होते इंग्रजांनी हिंदुंचे हे विखुरलेले वैदीक साहीत्याचे आधुनिक पद्धतीने एकत्रिकरण करण्याचे ठरवले. आणि ते ही असे की जसे इंग्रजांना या देशावर राज्य करण्यासाठी सोईस्कर ठरेल अशा पद्धतीने आणि याच वैदीक साहित्याचे आधुनिकिकरण करताना इंग्रजांनी त्यामध्ये स्वत:च्या सोईनुसार भेसळ केली ज्याचा उपयोग इंग्रजांना त्यांच्या फोडा-झोडा आणि राज्य करा अशाप्रकारच्या राजकारणाला पुरेपूर झाला. त्यानी या वैदीक साहित्यामध्ये अशाप्रकारे भेसळ केली की ज्याद्वारे हिंदुंच्या मनात शंका निर्माण होतील. वस्तुत: इतिहास हा असा विषय आहे की तो कोणत्याही देश किंवा समाजाच्या विविध परंपरा तसेच मान्यता तसेच महापुरुशांच्या गौरवगाथा आणि संघर्षाच्या सामुहिक आढावा होय, ज्याचा उद्द्देश त्या देश अथवा समाजाची भावि पिढी त्यापासुन प्रेरणा घेवु शकेल. परंतु भारताचा इतिहास आज ज्या स्थितित आहे आहे त्या दृष्टीकोणातुन विचार केला असता निराशाच आति पडते. असो. तर इंग्रजांनी विस्कळीत अशा वैदिक ग्रंथांचे एकत्रिकरण आणि आधुनिकिकरण करत असताना त्यामध्ये अशाप्रकारच्या विकृती आणि फेरबदल केले की ज्यातुन पुढे सामाजीक कलहच निर्माण होईल जो इंग्रजांना राज्य करण्यासाठी आवश्यक होता. आणि या विकृती आणि फेरबदलाचा सरात मोठा उद्देश हा होता की भारतियांना त्यांच्या संस्कृती, महापुरुष आणि विद्वानांबद्दल घृणाच निर्माण व्हावी. कंपनी सरकार ने आपल्या उद्देशाच्या प्राप्ती साठी अशाप्रकारे बहुमुखी योजना बनवली या योजनेच्या अंतर्गत पाश्चात्य विचारवंत आणि वैज्ञानिकांनी, इतिहासकारांनी आणि शिक्षण-शास्त्रज्ञांनी, लेखक आणि अनुवादकारांनी, इंग्रज प्रशासक आणि ख्रिस्ती मिशनरी धर्मप्रसारकांनी भारताची प्राचिनता, व्यापकता, अविच्छिन्नता आणि एकात्मतेलाच नाही तर समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले. आणि याच अभियानाच्या अंतर्गत  असा प्रचार करण्यात आला भारतीय सभ्यता ही प्राचीन सभ्यता नाही, रामायण - महाभारत वगैरे घटना केवळ कल्पित आहेत वगैरे वगैरे आणि सत्तेत असल्यामुळे त्यांना या गोष्टीचा उचित लाभ मिळाला. आणि येथुनच सुरवात झाली ब्राम्हणद्वेशाची , त्या काळी ’इंग्रजांनी’ भारतीयांमध्ये वर सांगीतल्याप्रमाणे  समाजातील "ब्राम्हण" म्हणजे विद्वानांच्या महत्वतेला आणि प्रतिष्ठेला नष्ट करण्याच्या उद्देशाने एकत्रीत असे अभियान चालवले आजही विद्रोही तेच करत आहेत. या इंग्रजांच्या ब्राम्हणविरोधाबद्दल मोनियर विल्यम्स नावा्चा इंग्रज आपल्या "मॉडर्न इंडीया एण्ड दी इंडीयन्स" या पुस्तकाच्या तिसर्‍या आवृत्तीच्या पृष्ठ २६१ वर म्हणतो, "When the walls of the mighty fortrees of Brahmanism are encircled, undermined and finally stormed by the soldiers of the cross, the victory of christiannity must be signal and complete" म्हणजे "जेव्हा ब्राम्हणांची शक्तीशाली दुर्ग (मंदीरे) ख्रिस्ती सैनिकांद्वारे घेरली जातील, दुर्बल बनवली जातील आणि नष्ट केली जातील तेव्हाच ख्रिस्तिकरणाच्या पुर्ण विजयाचा संकेत मिळेल".
दुर्दैवाने इंग्रजांच्या नंतर तेच काम विद्रोह्यांच्या मार्फत अव्याहतपणे चालू आहे. आता या विद्रोह्यांना  कारण नसताना प्रतिसाद मिळणे कठीन आहे म्हणुन यांनी आता शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, छ. संभाजी महाराज इत्यादी महापुरुषांच्या नावाने त्यांचे विरोधक असलेल्या आणि भारताला १५० वर्षे गुलाम करुन ठेवलेल्या इंग्रजांचे हेच मिशनरी काम पुढे चालवत आहेत. आणि याचेच सबळ उदाहरण म्हणजे आर्य-अनार्य वाद जो इंग्रजांनी स्वत:च्या सोईसाठी बनवला होता , आज याच बादाचा उपयोग हे विद्रोही जनतेची माथि भडकवायला आणि स्वत:चा स्वार्थ साधुन घ्यायला करत आहेत.

Monday, June 29, 2009

होय, दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते

स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील उल्लेख, इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रे आणि बखरी या सर्व प्रकारच्या साधनांमधून दादाजी कोंडदेव यांच्या कामगिरीचे एक सुसंगत चित्र आपल्यापुढे उभे राहते. सुमारे शंभर वर्षांपूर्वीचे इतिहासकार
श्री. कृष्णराव केळूसकर यांच्यापासून ते सध्याचे नामवंत इतिहासकार प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यापर्यंत अनेक विद्वान इतिहासकारांनी दादाजी कोंडदेव यांच्या कार्याचे वर्णनही केले आहे.




पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याची नोंद ज्या एकमेव सहा कलमी शकावलीत आहे, त्या नोंदीतदेखील दादाजी यांचा स्पष्ट उल्लेख आहे. असे असतांना सत्तेच्या राजकारणाने अंध झालेले काँग्रेस शासन मूठभर मराठी संघटनांच्या दबावाला बळी पडून इतिहासातून दादाजी कोंडदेव यांचे नाव पुसण्याचा प्रयत्‍न करत आहे. याची सुरुवात दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्काराचे नाव बदलून झाली. तेवढ्याने समाधान न झालेल्या या ब्राह्मणद्वेष्ट्या मंडळींनी शिवस्मारक समितीत शासनाने निवडलेले शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला विरोध केला. या वर्षी नव्याने प्रकाशित झालेल्या इयत्ता ४ थीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शासनाने दादाजी कोंडदेव यांनी शिवरायांना शिक्षण दिल्याचा उल्लेख वगळून खरा इतिहास विद्यार्थ्यांपासून लपवण्याचे पाप केले. शहाजीराजे यांच्या अतिशय विश्‍वासू लोकांमध्ये दादाजी कोंडदेव यांचा उल्लेख इतिहासात आढळतो. लेखामध्ये दादाजी कोंडदेव यांच्या व्यक्‍तीत्वातील विविध पैलंूबद्दल या लेखात माहिती देत आहोत. दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराज यांचे राजकीय गुरु होते, याबद्दल पुरावे सांगणारी माहिती उद्याच्या अंकात प्रसिद्ध होणार्‍या उत्तरार्धात वाचा. (

शाहजी महाराजांकडून पुणे परगण्याच्या देखरेखीसाठी दादाजी कोंडदेव यांची नियुक्‍ती
आदिलशाहीने वैराण केलेल्या पुणे परगण्याची पुन्हा भरभराट करण्याकरता शाहजी महाराजांनी दादाजी कोंडदेव यांची नेमणूक केलेली होती. पुणे परगणा व त्याच्या आसपासचा जो मुलूख शाहजी महाराजांकडे जहागीर म्हणून होता, त्याचा कारभार शाहजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार या नात्याने दादाजी कोंडदेव पाहात असे. दादाजी कोंडदेव यांचा जुन्यातला जुना उल्लेख इ.स. १६३३ मधील एका पत्रात आला आहे. पुणे परगण्यातील महमदवाडी या गावासंबंधी हे पत्र आहे. त्यात त्या गावचा पाटील जाऊ पाटील याने लिहून दिले आहे की :
`बापूजी देऊ पाटील घुले हा आपला भाऊ दुष्काळ पडला म्हणून गाव सोडून परमुलुखाला गेला. त्यावर वडील तो मेले. आम्ही वाचलो. सुकाळ झाला. यावर दादाजी कोंडदेव सुभेदार दिवाण झाले. त्यांनी मुलूख लावला. देशमुख, देशकुलकर्णी यांना ताकीद केली की, ``हा गाव पडला, पाटील आणऊन गाव लावणे.'' मग आपणास नेऊन कौल (म्हणजे अभय, आश्‍वासन) देऊन गाव लावला. (संदर्भ : शिवचरित्रसाहित्य, खंड २, लेखांक ९५.) याच प्रकरणी, याच तारखेचा व याच आशयाचा, एक कागद गोताच्या साक्षीने करण्यात आला. त्यातही ``राजश्री दादाजी कोंडदेव सुभेदार येऊन गावाची गाव लाविला'' (म्हणजे ओसाड पडलेली गावे परत वस्ती करवून भरभराटीस आणली) असा उल्लेख आहे. (संदर्भ : शिवचरित्रसाहित्य, खंड २, लेखांक ९६.)

इतिहासातील दाखल्यांकडे दुर्लक्ष करून दादाजी कोंडदेव व जिजाऊबाई यांच्या संबंधांवर अश्लील लिखाण करणारे जेम्स लेन !
शाहजी महाराज आणि मातुश्री जिजाबाई यांच्याविषयी दादाजी कोंडदेव यांची काय भावना होती ? छत्रपती शाहू महाराजांनी शिरवळ परगण्याच्या देशकुलकर्णीविषयीच्या एका तंट्याचा निवाडा करून त्या परगण्याचा देशपांडे म्हणजेच देशकुलकर्णी, यादो गंगाधर, याला दिलेले १ ऑक्टोबर १७२८ या तारखेचे एक अस्सल वतनपत्र उपलब्ध आहे. (संदर्भ : ३. शिवचरित्रसाहित्य, खंड १, लेखांक ८२ (पृ. ९३ ते ९७) पुरावा म्हणून जी कागदपत्रे शाहू महाराज यांच्यासमोर त्या प्रकरणी दाखल करण्यात आली, त्यात दादाजी कोंडदेव यांनी शिरवळ परगण्याच्या हवालदाराला पाठविलेले २ एप्रिल १६४६ या तारखेचे एक अस्सल पत्र होते. ते पत्र छत्रपती शाहू महाराजांनी ग्राह्य मानले आहे आणि वर नमूद केलेल्या त्यांच्या वचनपत्रात उद्धृतही केले आहे. दादाजी कोंडदेव यांच्या त्या पत्रात जिजाबाई साहेबांचा उल्लेख `सौभाग्यवती मातुश्री जिजाआऊ साहेब' असा आला आहे. (४. शिवचरित्रसाहित्य, खंड १, लेखांक ८२ (पृ. ९६) राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांच्याविषयी खोटा, गलिच्छ व हलकट मजकूर लिहिणारा जेम्स लेन आणि त्या हलकट मजकुराचा प्रचार व प्रसार करणारी मंडळी यांना दादाजी यांच्या पत्रातला हा `मातुश्री जिजाआऊ साहेबांचा' उल्लेख हे चोख उत्तर नाही का ?

दादाजी कोंडदेव यांच्या विविध कामगिरींबद्दल ऐतिहासिक पुरावे !
शाहजी महराजांच्या नोकरीत सुभेदार म्हणून काम करत असतांना दादाजी यांना वतनासंबंधीच्या निरनिराळया तंट्यांचे निवाडे करावे लागले. गोतसभेत दादाजी यांच्या उपस्थितीत झालेल्या अशा निदान नऊ निवाड्यांची कागदपत्रे उपलब्ध आहेत. (मराठ्यांच्या इतिहासाची साधने) दादाजी कोंडदेव यांनी उजाड झालेला मुलूख पुन्हा लागवडीखाली आणला, अशा आशयाचा उल्लेख अनेक कागदपत्रांमध्ये व बखरींमध्ये आलेला आहे. (उदा. शिवचरित्रसाहित्य, खंड २, मराठ्याच्या इतिहासांची साधने, ऐतिहासिक संकिर्ण-साहित्य, इत्यादी) पुणे परगण्यातील बाणेर (सध्याचे बाणेर) या गावी दादाजी कोंडदेव यांनी पिण्याच्या पाण्याकरता पाट बांधून आणल्याचा उल्लेख एका पत्रात आला आहे. (पेशवे दप्‍तरातून निवडलेले कागद, खंड ११, लेखांक ६५). पुण्यातून वाहणार्‍या आंबील ओढ्याला दादाजी कोंडदेवाने धरण बांधल्याचा उल्लेखही एका जुन्या कागदात आहे. (पुणे नगर संशोधन वृत्त, खंड १, टाचण क्र. ४८).

Thursday, February 5, 2009

Downlodes ....

अभिषेक मंत्र !!.............http://www.ziddu.com/download/3412638/b01ABHISHEKMANTRA.zip.html
.
.
.
श्री शिव-सूर्य ह्रदय !...........http://www.ziddu.com/download/3412845/b02SHIVSURYAHRUDAY.zip.html
.
.
.
.
संभाजी-सूर्य ह्रदय !!.........http://www.ziddu.com/download/3413172/b04MarathaMhanave.zip.html
.
.
.
.
मराठा म्हणावे अश्या वघराला !!............http://www.ziddu.com/download/3413172/b04MarathaMhanave.zip.html
.
.
.
.
हिंदुत्व-वादी wallpapers !!...........http://www.ziddu.com/download/3412308/Hindutwa_wallpapers.zip.html

Saturday, January 17, 2009

धोबीपछाड १

गेले काहि दिवस माती मऊ आहे म्हणुन ती मुळाने खणण्याचा अट्टाहास काहि जण करीत आहेत. पण आता परीस्थिती अति झालं आणि हसु आलं याच्याहि बाहेर गेलीये. मुळात फक्त ब्राह्मण द्वेष हा एक आणि एकच अजेंडा काहि संस्थांकडुन अव्याहत राबवला जातोय. आणि त्याला कोणाचा राजकिय पाठिंबा आहे हे उघड-गुपित आहे.

तसा मूळातुन विचार करता ब्राह्मण समाजाने दलितांवर बरेच अत्याचार केले आहेत हा सत्य इतिहास आहे. पण सगळं खापर जे एकट्या ब्राह्मणांवर फोडलं जातय त्यात मात्र तथ्य नाहिये. उलट ब्राह्मण समाजापेक्षाहि काकणभर जास्त इतर वर्णांनी त्रास दिलाय. बर्‍याच दलित नेत्यांनी तसं स्पष्टपणे ऐकवले सुध्दा आहे. सध्या ब्राह्मणांवर गरळ ओकण्याचा जो काहि हिन प्रकार सुरु आहे तो शिसारी आणणारा आहे. फुले-आंबेडकर-शाहु-शिंदे यांनी देखिल इतक्या खालच्या थराला जाऊन ब्राह्मणांवर गरळ ओकली नव्हती. आणि तसे बघता यांचे काहि सहकारी अथवा यांना पाठिंबा देणारे काहि जण तर ब्राह्मणच होते. महात्मा फुलेंना शाळेसाठि जागा देणारे “भिडेच” होते. बालगंधर्व तर शाहुंच्या गळ्यातील ताईतच होते, इतके कि शाहुंचे उजवे हात समजले जाणारे जाधव प्रभुती देखिल “तुम्हांला बालगंधर्व जास्त जवळचे वाटतात !” असे हिरमुसुन म्हणताना दिसतात. शिंदे तर टिळकांच्या जवळच्या व नंतर तात्विक वादांमुळे दुर गेलेल्यांपैकी एक. महर्षी शिंदे यांनी सावरकरांवर त्यांच्या जात्योच्छेदनाच्या कार्यामुळे जाहिर स्तुतीसुमने उधळली होती. थोडक्यात सामाजिक-राजकिय अथवा तात्विक कारणांनी वरील प्रस्थापितांनी ब्राह्मणांवर कडक ताशेरे ओढले होते पण त्यांनी “गरळ” ओकली नव्हती. उलटपक्षी टिळक-शाहु वादात एका केस संबधी काहि अति गोपनीय कागद टिळकांपर्यंत पोहोचतील व टिळकांना त्यांचीच बाजु भक्कम करता येईल अशी व्यवस्थाच शाहुंने केल्याचा उल्लेख मिळतो. याबाबत प्रबोधनकारांनी शाहुंना प्रश्न विचारल्यावर “अरे तो(लोकमान्य टिळक) तिथे इंग्रजांशी एकहाती झुंज घेत असताना त्याच्या मार्गात कुटल्याहि कारणाने आम्हि का यावे?” असे उत्तर दिले. आणि आज त्याच टिळकांवर “लोकमान्य कसला भटमान्यच” असे एकेरी शेलकी विशेषण लावत हे फिरत आहेत. आणि अशी शेलकी-निर्बुध्द विशेषणे एकट्या लोकमान्यांवरच नव्हे तर “ब्राह्मण” असलेल्या प्रत्येकावर चिकटवत फिरत आहेत.

आता दादोजी कोंडदेव-समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक-राजकिय संबधांवर बोट ठेवण्यात येत आहे. तसा तर हा वाद जुनाच आहे. सुरुवात महात्मा फुल्यांनी केली. “गागाभट्ट व रामदासाने निरक्षर शिवाजीस गोड बोलुन फसविले!” अशी एक ओळ देखिल त्यांच्या लिखाणात सापडते. पण छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्ती निरक्षर मुळिच नव्हती व समोरचा गोड बोलतोय म्हणुन फसेल अशी तर नव्हतीच नव्हती. भारतात जे “द्रष्टे” झाले त्यापैकी एक असलेले शिवराय अश्या भुलथापांना बळि पडत असते तर स्वराज्य उभे राहिलेच नसते. महाराज काळाच्या फार पुढचा विचार करायचे. आणि महाराजांना माणुस ओळखता यायचा म्हणुनच “आम्हि महाराजांचे सेवक, तुझा कौल कोण घेतो? शिवशंभु आम्हांस हसेल!” असे म्हणत दिलेरखानावर दातओठ खाणारा मुरारबाजी पुरंदरावर स्वराज्यासाठी पडला. अशी माणसे गोळा करुन एकत्र आणणारे शिवराय गागाभट्ट व रामदास स्वामी यांना ओळखणार नाहित काय?

विषय निघालाच आहे तर सांगतो कि गागाभट्ट व शिवराय काहि राज्यभिषेकाच्या निमित्तानेच एकत्र आले नव्हते. तर त्याच्याहि आधी बरीच वर्षे म्हणाजे निदान ८-१० वर्षे आधी शेणवी समाज्याच्या निवाड्यात गागाभट्ट शिवाजीराजे जो निर्णय देतील तो मान्य करावा. असे विधान करतात. आता गागाभट्टांसारखा वेदशास्त्रसंप्पन दशग्रंथी ब्राह्मण एका जातीच्या निवाड्यात राज्याभिषेका आधीच राजांना न्याय देण्यास सांगतो म्हणजे गागाभट्टांना शिवरायांचे कार्य व त्यांची निर्विवाद योग्यता आधीच माहित होती असे दिसते. दुसरी गोष्ट – राज्याभिषेक झाल्यावरच राजाला अथवा त्या क्षत्रियाला ब्राह्मणांच्या सामाजिक-धार्मिक अथवा कौटुंबिक प्रश्नात निर्णय देता येत असे. गागाभट्टांना जर महाराजांना फसवायचे होते तर त्यांना राज्यभिषेक करवलाच कसा? कारण त्यांना ब्राह्मणसमाजाचे वर्चस्व अबाधित ठेवायचे होते तर कितीहि दक्षीणा दिली तरी त्यांनी महाराजांना राजेपद द्यावयास संमती दिलेच नसती. आणि कोटी रुपये दक्षीणा अथवा यांच्याच भाषेत सांगायच तर “लाच” हि गागाभटांसाठि मोठी गोष्ट नव्हती. काशी क्षेत्रीचा वेदोमुर्ती म्हंटल्यावर पैसा-मानमरातब-प्रसिध्दि हे त्यांना अज्जिबात नविन नव्हतं. ती दक्षीणा मिळणारच होती. यांचा अजुन एक आक्षेप असतो की “माझ्या हातुन काहि प्रमाद घडल्यास अथवा मी माझी राजाची कर्तव्ये पार पाडण्यात कसुर केल्यास, राजगुरु माझ्या मस्तकावर धर्मदंडाचा प्रहार करुन मला पदच्युत करतील!” अशी शपथ महाराजांना घ्यायला लावली होती. इथे त्यांना बामनी कावा वाटतो, पण जर महाराजांना प्रजेचा निवाडा करण्याचा हक्क असेल तर राजावर देखिल एखादा अंकुश असलाच पाहिजे. मुळात धर्मसत्ता व राजसत्ता यांना एकमेकांचा धाक नसेल तर राज्य टिकत नाहि. गावचा पाटिल झाला म्ह्णुन गावच बुडवावा का? ते तसे होऊ नये म्हणुन गेली हजारो वर्षे भारतातच नव्हे तर जगभर राजसत्ता-धर्मसत्ता एकमेकांना धरुन असतात. याचा अर्थ राजा वाईट असतो म्हणून नव्हे तर आअपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडतो अहोत की नाहि हे बघणारं कोणी असेल तर काम नीट होतं. इथे तर समाजाचा प्रश्न अहे. आणि एकट्या शिवरायांनाच नव्हे तर कुठल्याहि राजाला हि शप्पथ घ्यावीच लागायची.

दुसरा मुद्दा येतो समर्थ रामदासांचा. समर्थ रामदासांचे अध्यात्मिक कार्य प्रचंड आहे. ज्याकाळी दुष्काळ, कर्ज, रोगराई यांच्या बरोबरच सुलतानशाहिने जनता पिंजुन गेली होती तेव्हा जे संत जनतेला मानसिक आधार देऊन परमार्थाचा उपदेश करत होते त्यापैकिच एक रामदास स्वामी होते. पण सद्य कालात ते फक्त ब्राह्मण होते हा एक आणि एकच मुद्दा त्यांच्या कार्यावर पाणी फिरवण्यासाठी या संस्थांना पुरेसा आहे. रामदास आदिलशाचे हेर होते असे एकजण म्हणतो दुसरा तेच औरंगजेबाचे हेर होते असे म्हणतो. निदान आरोप करताना तरी एक काहितरी बोलावे?? पण मुळात आरोपच बिनबुडाचे असल्याने ह्यांची जीभ सैल सुटली आहे. इतकी कि समर्थांचे चारीत्र्य हनन करायला - आपल्या स्त्री शिष्यांबरोबर चाळे करणारा “रंडिबाज रामदास” असा गलिच्छ प्रचार हि मंडळी करीत आहेत. यांच्यातले काहि विकृत लोकं दुसरीकडे म्हणतात कि रामदास नपुंसक होते म्हणुनच त्यांनी लग्न केले नाहि आणि म्हणुनच ते मांडवातुन पळुन गेले होते. खरतर समर्थांचे कार्य किती मोठे आहे हे सर्वांनाच माहित आहे तरी त्याचे पुन: पुन: उच्चारण यासाठी करावे लागतेय कि आज गप्प बसलो तर यांच्या विकृत चाळ्यांना अजु चेव येईल. त्यामुळे हे झोपेचे सोंग घेतलेले जागे हॊणार नाहित हे माहिती असल्याने या बिनडोक लोकांकरीता नव्हे तर समाजाला यांचे ढोंगी बुरखे फाडुन दाखवण्यासाठी हा प्रपंच आहे. पुन्हा समर्थांबाबत सांगायचे झाले तर समर्थ जर शत्रुचे हेर असते अतवा भ्रष्ट चारीत्र्याचे असते तर सातार्‍यासारख्या अतिमहत्वाच्या टिकाणचा किल्ला महाराजांनी समर्थांना मठ बनवायला कशाला दिला असता? उलटपक्षी स्वराज्याच्या आसपासहि रामदासांना फिरकु दिले नसते. कींवा रामदास हिन चारीत्र्याचे असते तर महाराजांनी अश्या गुन्हेगारांचे हातपाय कलम करायचा कडक नियम बनवला होता. असे असताना राज्याभिषेका नंतर थोड्याच दिवसांनी समर्थ स्वत: प्रतापगडावर ठोसर घराण्याचा नवस फेडण्यासाठी येऊन गेल्याचा उल्लेख आहे. व त्यावेळी प्रतापगडाच्या किल्लेदारास समर्थांची योग्य ती काळजी घेतली जावी व त्यांना कसलहि कमी पडु देऊ नये अश्या आशयाचे पत्र महाराजांनी लिहिल्याचे समजते. तिच गोष्ट सज्जनगडाची. अजुन एक गंमतीचे गोष्ट “भिक्षा” हा रामदासींचा किंवा संन्याश्यांचा धर्म आहे. दासबोधात तर भिक्षेवर एक वेगळे प्रकरण रामदासांनी सांगितले आहे ते मुळातुन वाचण्यासारखे आहे. असो, तर “भिक्षा” या गोष्टिवरुन यांनी तुकाराम महाराज व रामदास यांना एकमेकांसमोर उभे केले आहे. पण याचा अर्थ यांची बुध्दी कमी तरी आहे किंवा हे मुद्दाम तसे करत आहेत. कारण रामदासंची भिक्षा व तुकारामांची भिक्षा यांत फरक आहे. तुकाराम भिक्षा हा शब्द “भिक” या अर्थाने वापरतात. तर समर्थ कोरड्या अन्नाची भिक्षा हा समाजाच्या प्रत्येक घरा पर्यंत जाण्याचा आणि देवकार्याचा प्रचार करण्याचे उत्तम साधन समजतात. बाकिचे जाऊदे ज्या बुध्दाचे हे लोक गोडवे गाताना ब्राह्मणांवर टिका करतात त्या बुध्दाने देखिल भिक्षा मागावी असेच सांगितले आहे. ह्या दोघांचे जर पटत नसते तर ते एकमेकांना भेटलेच नसते. तुकाराम महाराज व रामदास स्वामी एकमेकांना भेटल्याचा स्पष्ट उल्लेख आहे इतकेच नव्हे तर रामदासांनी तुकारामाची स्तुती करताना “धन्य धन्य तुका वाणी। धन्य धन्य तुझी वाणी।“ असे एक पद लिहिले आहे तर रामदासांनी जे अकरा मारुती थापन केले त्यापैकी एका मारुती साठी तुकारामांनी अभंग लिहिला आहे. या शिवाय शिवराय निधन पावल्यावर “शिवरायाचे आठवावे रुप। शिवरायाचा आठवावा प्रताप।“ हे पत्र त्यांनी शंभुराजांना लिहिलेच होते कि. खुद्द महाराजांना त्यांनी “श्रीमंत योगी” आणि “जाणता राजा” अशी योग्य पदवी देऊन एक दीर्घ पत्र लिहिले होते जे आज प्रत्येक मराठी माणसासाठी शिवरायांचे जिवंत शब्दचित्रच आहे.

आता आपण दादोजी कोंडदेवांबाबत बोलुया. यांचे म्हणणे आहे कि दादोजी शिवरायांचे गुरु नव्हते. ठिक आहे ते गुरु नव्हते असे मानले तरी म्हणुन दादोजींचे शिवरायांच्या आयुष्यातले स्थान कमी होत नाहि. शिवरायांनी पंतांना खुप आदराने वागविल्याचे अनेक पत्रावरुन समजते. जेम्स लेनने जे विकृत लिखाण केले ते केवळ कचर्‍यात टकण्याच्या लायकिचे आहे हे १००% सत्य. पण जेम्स लेनने जो विकृतपणा केला त्याचे सगळे दोष ते दादोजी कोंडदेवांचे चरीत्र आणि शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांना देतात. मुळात अजुन एक गोष्ट समाजातील लाखो लोकांना माहित नाहि कि हे पुस्तक प्रकाशित होताच शिवराय-जिजाऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव यांच्यावर जे अतिविकृत लिखाण लेनने केले त्याविरुध्द बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, मेहेंदळे या आणि अश्या जेष्ठ इतिहासकारांनी ऑक्सफर्ड प्रेसला पत्र लिहुन त्याविरुध्द निषेध नोंदवला होता आणि त्याचाच परीणाम म्हणजे ऑक्सफर्ड प्रेसने “आम्हि त्या पुस्तकाचे सर्क्युलेशन ताबडतोब थांबवले आहे!” असा उलट लेखी निरोप यांना कळवला होता. हे सगळे घडत असताना या बेशिस्त संस्थेचे नेते काय विड्या फुंकत बसले होते का? यांना जाग आली तोवर बाबासाहेबांनी कारवाई करुन बघा मी केले मी केले असे अवडंबर माजवले नाहि. तरी यांनी काहिहि जाणुन न घेता किंवा माहित असुनहि मुद्दामच भांडारकर फोडले कारण यांना काहितरी खुसपट काढायचेच होते ते त्यांना मिळाले त्यातुन शिवराय-जिजाऊसाहेब हा तर प्रत्येक मराठी माणासाचा मानबिंदु ! मग काय विचारता? भांडारकरच्या निमित्ताने बाबासाहेबांवर - ब्राह्मणांवर गरळ ओकायला सुरुवात झाली. सुदैवाने समाजातील ९८% लोकांनी बाबासाहेब असे करुच शकत नाहित असा सार्थ विश्वास बाबासाहेबांवर दाखवला. त्यामुळे यांची गोची झाली. यांनाकोणे विचारीनासे झाले. करायचं काय आपली चुल तर जळत राहिली पाहिजे त्यात इंधन काय? बाबासाहेब किती दिवस पुरणार? हा प्रश्न यांना पडला मग मराठा आरक्षणासाठी हे गाड्या जाळत सुटले. कुणबी मराठा एक आहेत मराठा समाजाला अरक्ष्ण द्या म्हणुन आंदोलने करु लागले. कुणबी समाजाने त्याला विरोध केल्यावर तर अजुनच चेकाळले आहेत. शिवाय उलटपक्षी बर्‍याच मोट्या मराठा समाजाचे आणि विशेषत: आजच्या तरुण पिढीचे म्हणणे आहे “कशाला हवेय आरक्षण? आमच्या मनगटात ताकद आहे, स्वत:ची विचार शक्ती आहे!” त्याने ह्यांच्या समोरचे प्रश्न अजुनच कठिण होत आहेत. तरी साप-साप म्हणु भुई धोपटण्याचे काम हे इमाने-एतबारे करीत आहेत. हीच ताकद त्यांनी समाज एकत्र कसा येईल याकरीता लावली तर महाराष्ट्राचे पर्यायाने देशाचे भले होईल.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलायच झालं तर त्यांच्याच नावाने हि ब्रिगेड सुरु आहे. आणि संभाजीराजांना बामनांनी त्रास दिला अशी हाकाटि देऊन समाजात गैर समज पसरवला जात आहे.
महाराजांना एकट्या ब्राह्मणांचाच त्रास झाला होता का? शंभुराजांना पकडुन देणारा गणोजी शिर्के कोण होता? आणि शंभुराजां बरोबर अखेरपर्यंत राहणारा कवी कलष कोण होता? हे बघा आधी. इथे कोणा एका जातीवर मला टिका करायची नाहिये पण एकट्या ब्राह्मणांनी हे केल नाहिये हे सांगताना काहि दाखले देण भाग आहे.

अजुन एक मुद्दा शिवराय काय किंवा शंभु राजे काय यांच्या विरुध्द अफझलखानाच्या अथवा औरंग्याच्या मागे कंबरेला शोभेच्या तलवारी लावुन, आणि अपल्या षंढ मिश्यांना पिळ भरत स्वराज्या विरुध्द उभे राहणारे कोण होते याची यादि बघा आधी. मग ठरवा कि बामणाने चुक केलीये कि या ब्रिगेडच्या पुर्वजांनी? एक मुरारजगदेव काय सापडला शहाजीराजां विरुध्द मोहिम लढणारा, हे भोसल्यांशी सात जन्माचे वैर सांगणार्‍या घोरपडे-सावंतांना विसरले? शहाजी राजांची अफझलने कॊणाच्या मदतीने धिंड काढली होती? हे सांगतात जसवंतसिंहाला स्वत: ब्राह्मणांनी सहस्त्रचंडि करायला मदत केली होती जेणे करुन शिवाजी राजाचे तळपट होईल आणि परत बामनांची सत्ता येईल म्हणुन, पण असे होम-हवन करुन कोणी जिंकत असतं तर महाराजांनी राजगड-रायगडावर राजसुर्य आणि अश्वमेधच करायला हवे होते ना? ब्राह्मण तिथेहि आले असते. हेच म्हणतात दक्षिणेच्या पैशावर हि फुकटि लोकं वाढतात म्हणुन. गागाभट्टाने घेतली होती १ कोट रुपये दक्षीणा वगैरे वगैरे.. मुळात आपण काय बोलत आहोत हेच यांना समजत नाहि. ब्राह्मणांनी जे चांगलं केलय त्या बद्दल हे हरामखोर लोक एक चकार शब्द काढत नाहित उलट झालच तर त्याचे अति विकृत लिखाण करतात.
ह्या लोकांना एकतर स्मृतीभ्रंशाचा त्रास आहे. मागे आपण काय बोललो होतो काय लिहिलं होत हे साफ विसरतात. एकदा म्हणातात अफझलखानाच्या नावाचा वापर करुन संघ-विहिंप हि लोकं मराठा(हिंदु पण नाहि बर का!) आणि मुस्लिम समाजातील दरी वाढवत आहेत, आणि नंतर मानसिक संतुलन बिघडल्यागत बरळतात कि अफझलखानाचा वकिल कृष्णाजी भास्कर या बामनाने महाराजांवर तलवार चालवली होती, आता समाजाला कृष्णाजी भास्कराच्या त्या क्रुष्णकृत्याचा विसर पडावा म्हणुन हे प्रतापगडावरील अफझलाच्या कबरीला विरोध करीत आहेत आणि अफझलखानाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करीत आहेत वगैरे वगैरे. आता शेंबडे पोर तरी यावर विश्वास ठेवेल का? आधी सिद्दी जौहराला कोण मदत करत होतं त्यांची नावे बघा. फाजलखानाला जावळीच्या जंगलातुन वाट शोधायला कोणी मदत केली ते बघा. विशाळगडाला मोर्चे लावुन शिवरायांना अडवणारे कोण होते त्यांची नावे बघा दिसतोय एक तरी बामन?


टिळकांवर चिखलफेक करताना “फक्त भटमान्यच” असे विशेषण लावले जाते, बहुदा “लाल-बाल-पाल” ह्या त्रयीने काय घडविले होते हे यांना ठाऊक नसावे. बंगालमध्ये शिवजयंतीचा उत्सव टिळकांनीच सुरु केला होता. टिळकांना इंग्रजस सरकारने हवापालटासाठी मंडालेयात पाठवले नव्हते हे देखिल यांना माहित नसावे. टिळकांना ६ वर्षांची शिक्षा झाली तेव्हा लाखो गिरणी कामगारांनी मुंबईत ६ दिवसांचा संप केला होता जो भारतात इंग्रजां विरुध्द कामगारांनी केलेला “पहिला संप” होता. ते भटमान्य असते तर हे झाले असते का? लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सर्व भारताचे “तिलक महाराज” झाले बंगालचे “बडेदादा” झाले ते कसे? काहितरी आचरटागत लिहायच कि झालं??? यांनी भांडारकर फोडल्यावर जेव्हा यांच्या उपद्रवी कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडले होते तेव्हा एखाद्या दुकानदाराने दुकानाचे अर्धे शटर तरी खाली केले होते काय? आपण कोण आहोत? गल्लीच्या पलीकडे आपल्याला कोणी ओळखतो का? आपला पगार किती आपण बोलतो कीती? याचा विचार न करता फक्त बरळत रहायचं इतकच यांना येतं. हे शिवश्री खेडेकर सर, नरके सर अश्या थाटात लिहितात कि हे कोणा गुरुदेव रविंद्रनाथांबद्दल, लिओ टॉल्स्टॉय बद्दलक किंवा मार्क्स बद्दल सांगत असावेत.

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्याबद् दल लिहिताना तर यांनी किळसवाणे लिहिले आहे. “संडासवीर सा(डि)वरकर” हि यांची भाषा आहे. सावरकरांनी जे जात्योच्छेदनाचे काम केलेय त्या बद्दल यांना काहिहि घेणे देणे नाहिये कारण ते फक्त ब्राह्मण होते. इतके तर हे कृतघ्न आहेत.

अजुन एक जहरी अपप्रचार यांच्याकडुन केला जातो कि शिवाजी महाराजांचे खरे शत्रु म्हणाजे ब्राह्मणच. शिवाय त्यांच्या वेबसाईटवर महाराज एका ब्राह्मणावर तलवार चालवुन त्याचे शीर उडवत आहेत असे दाखवण्यात येते. पण या मुर्खांच्या एक गोष्ट लक्षात येत नाहि या चित्राचा परीणाम म्हणजे ब्राह्मण महाराजांचे नव्हे तर महाराजच ब्राह्मणांचे शत्रु होते असा अत्यंत चुकिचा संदेश समाजात अपोआप पसरवला जातोय. महाराजांचे शत्रु जण ब्राह्मण असते तर महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात ६ ब्राह्मण कसे? अग्र्याहुन सुटका करुन घेताना नऊ वर्षाच्या आपल्या पोटच्या पोराला एका ब्राह्मण कुटुंबातच का ठेवले? आग्र्याहुन सुटका झाली तेव्हा पाठीमागे जे दोन ब्राह्मण फुलादखानाला मिळाले त्यांचे केवळ अमानुष हाल केल्यावरहि महाराज कसे निसटले या बाबत त्यांनी अवक्षरहि काढले नाहि. पुढे ते सुटुन आल्यावर महाराजांनी त्यांचा फार आपुलकिने सत्कार केला होता. संभाजीराजां बरोबर शेवटपर्यंत कोण होता? कवी कलशच ना? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातली “थोरली मसलत” म्हणजेच दिल्लीवरचा हक्क बाजीरावानेच प्रस्थापित केला ना?

इतकी विकृत विचारसरणी वापरताना ते दुसर्‍या बाजुला आपले म्हणणे मांडण्यासाठी शिवराय, संभाजीराजे, आंबेडकरांचे नाव घेतात हे अजुन क्लेषदायक आहे.

Friday, January 16, 2009

या प्रश्नांची उत्तरे शोधा !!!!

संभाजी ब्रिगेड चे स्वघोषित इथिहस कार आस म्हणतात की
१ समर्थ रामदास हे औरंगजेबाचे हेर होते -
आता माला संग की जर ते औरन्ग्जेबा चे हेर होते तर शिवाजी महाराजन नि त्यां ना आटक का केलि नहीं, की शिवाजी महारा जन ना आस माहित नवाते याचाच आर्थ आसा जाला की शिवाजी महाराजन ची निति कमजोर होती त्यांनी औरंग च्या हेराला सज्जनगड हां किल्ला रहायला dilaa .
२ स्वराज्या आभिशेकाचा दिवशी गागा नि पाया नि कुन कु लावले-
म्हणजे शिवाजी महाराजन नि त्याला लावू दिले काहीही केले नहीं.
३ शिवाजी महाराजन चे गुरु तुकाराम महाराज होते रामदास नहीं- माला तुम्ही फ़क्त पुरवा दया की तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराज भेटले होते याचा,
४.आफ्ज़ुल्खानाचा वकील बामन होता-
शिवाजी महाराजन चा वकील बोकिल काका हे सुधा बामन होते.
५.शिवाजी महाराजन ना बमानन बदहाल द्वेष होता म्हणुन त्यानी ८ प्रधान मंदालामधे ७ बामन नेमले..
६. संभाजी ब्रिगेड नि प्रकाशित केलेल्या फोto मधे शिवाजी महाराजन नि तुकाराम महाराजन चाप्य पडल्यात- तुकाराम महाराज जेम्हा स्वर्गात गेले तेम्हा शिवाजी महाराजन चे वे १८-१९ होते त्या फोटो मधे शिवाजी महाराजन ना मोठी दाढ़ी आहे १८ व्या वर्षी..?
७ श्री मदन पाटिल साहेबान नि आस लिहिले आहे की (जिजयु साहेब pustakatat ) की शिवाजी महाराजा नि बमनाला लाच दिली- संविधानानुसार लाच देणारा हां लाच घेणार्या पेक्षा मोठा गुन्हेगार आसतो.
८, श्री महावीर राओ खान साहेब म्हणतात की पर्शुरमा चा वध...-
मग परत परशुराम महाभारतात कसा येतो
९.मनु स्मृति- जास्त बोलत नहीं पण पाहिले तो ग्रन्थ वाचा आणि नंतर बोला. मनु हां शात्रीय होता बामन नहीं
१० तुकाराम महाराजन चा खून- ओके मग शिवाजी महाराजन ni kaa kahi बमानन var kahi kele नहीं की त्यांना माहित नवाते म्हणजेच त्यांचे हेर खाते bhrastyaa चारी होते kaa

11. shivaji maharaaj aani samarth yanchaatil patraa खोटे-
हो मला माहित आहे की तेम्हा भ्रस्ताचार खूप होता म्हणुन आस म्हणजे आमचा शिवाजी महाराजन चा राज्यात भ्रस्त्याचार खूप होता आस म्हाने चे आहे का यां ना?
१२ शिवाजिमाहराजन ना बामन आवडत नवते - म्हणुन त्यानी ७० बमानन ना इनाम दिला जमीनी दिल्या चफाल चा रामस संपत्ति दिली..
आता जरा हे पहा --
शिवाजी महाराजन च्या aashata pradhan mandalat बामन आने

11. shivaji maharaaj aani samarth yanchaatil patraa खोटे-
हो मला माहित आहे की तेम्हा भ्रस्ताचार खूप होता म्हणुन आस म्हणजे आमचा शिवाजी महाराजन चा राज्यात भ्रस्त्याचार खूप होता आस म्हाने चे आहे का यां ना?
१२ शिवाजिमाहराजन ना बामन आवडत नवते - म्हणुन त्यानी ७० बमानन ना इनाम दिला जमीनी दिल्या चफाल चा रामस संपत्ति दिली..
आता जरा हे पहा --
शिवाजी महाराजन च्या aashata pradhan mandalat बामन आनेक बमानन ना त्यांनी पत्र लिहिलेत इनाम दिलत, मराठी भाषेतील आरबी आणि फारसी शब्द काढले, मोराव्या गोवासी समर्थ ... यां ना इनाम जमीनी दिल्या म्हणजे ते मनु वादी होते त्यानी आनेक मंदिरे बांधली ..

bhavani devi he marathayan chaa shawash aahe aani he brigedi tyaa devilaa kay mhanatat- kokate- mi tyaa bhavani chaa photo laa chapalaa kadhato tethe thev to

ब्रिगेदी कमान मुले फ़क्त शिवाजी महाराज बदनाम हॉट आहेत बाकि कोणीही नहीं,
पाहिले इथिहस नित वाचा आणि मग बोला उअगीच बोलू नाका,